“विचार आणि आयुष्य उंचावणारं एकमेव लोकप्रिय मराठी पॉडकास्ट चॅनेल”
होस्ट अमित पारवे हे इंजिनियर, म्युझिक कंपोझर, गायक, लेखक आणि उद्योजक आहेत. मनाने ते एक शोधक, विचारवंत आणि जिज्ञासू प्रवृत्तीचे व्यक्तिमत्व आहेत. अज्ञात गोष्टींचा शोध घेणे, धर्म आणि विज्ञान यामधील सूक्ष्म दुवे उलगडणे आणि त्यामागील सत्य समजून घेणे, ही त्यांची खास ओढ आहे. ज्ञान, अनुभव आणि तर्क यांच्या आधारे ते श्रोत्यांसमोर असे संवाद आणि प्रश्न मांडतात जे फक्त माहिती देत नाहीत, तर विचारांना चालना देतात आणि मनाला स्पर्श करतात. तुमच्या-आमच्या मनातले प्रश्न उचलून त्यांना नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न हा त्यांच्या प्रत्येक संवादामागचा हेतू असतो. त्यांच्या या प्रवासाचा मुख्य उद्देश म्हणजे विज्ञान, अध्यात्म आणि वास्तव, आर्थिक साक्षरता, समाज कल्याण, इतिहास आणि नाविन्यपूर्ण माहिती मायबोली मराठीतून महाराष्ट्रातील तमाम घराघरात पोहोचवणे.
MY LIFE JOURNEY ↗
आमच्याशी सोशल मीडियावर जोडा आणि प्रत्येक नवीन भागाची अपडेट मिळवा
Have a story, experience, or knowledge worth sharing? Join TAP Podcast and inspire thousands of listeners. Fill the form or directly connect with us on WhatsApp.
We will contact you soon